माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून गेले

लता फाळके /हदगाव

मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी मागील वर्षी सुद्धा हदगाव तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत होती त्यावेळी हदगाव तसेच ही. नगर कोव्हीड सेंटर ला भेट देवून रुग्णांच्या तब्येती ची चौकशी केली होती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता.
आज सुधा नागेश पाटील यांनी कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर हदगाव येथे भेट देऊन पेशन्ट च्या ताब्यतीची विचारपूस केली व कुठलीही काळजी करू नका नांदेड सारखीच ट्रीटमेन्ट हदगाव येथे देण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी कोविड सेंटर येथे 100 बेडशीट व 40 बेड उपलब्ध करून दिले व सदरील ठिकाणी स्वछतेसाठी स्वतः तर्फे सफाई कामगार उपलब्ध करून दिला व तेथील नादुरुस्त पंखे स्वखर्चाने दुरुस्त करून दिले. कोविड रुग्णालय हदगाव येथे 50 बेडशीट उपलब्ध करून दिले…पोलीस स्टेशन हदगाव येथे जाऊन एक कॉन्स्टेबल कोविड रुग्णालयात व एक कॉन्स्टेबल कोविड केअर सेंटर ला देण्यात यावा अशी विनंती पी.एस.आय. पांढरे साहेब यांना केली. नागेश पाटील यांच्या भेटीमुळे खूप धीर आला अशा भावना यावेळी रुग्णांनी व्यक्त केल्या. या वेळी जी. प. सदस्य गजानन गंगासागर, डॉ.स्वामी साहेब,डॉ.स्वाती म्याडम,शिवसेना शहरप्रमुख राहुल भोळे,शिवसेना नगरसेवक बाळा माळोदे, दीपक मुधोळकर,किशोर भोस्कर ,संभाजी खंदारे,मोतीराम वानखेडे,पत्रकार पतंगे मामा,आशपाक सेठ, बबन जाधव कोळगावकर,अभिषेक चंदेल,निकेश बोंबले,व इतर मंडळी उपस्थित होते.