सामाजिक वनीकरण मार्फत चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे तात्काळ बंद करून संबंधितावर कार्यवाही व्हावी.:

  • सिताराम पाटील फळीकर
    (कॉंग्रेस शक्तिॲप अध्यक्ष)

लता फाळके /हदगाव

सामाजिक वनीकरण कार्यालय अंतर्गत हरडफ रोड ते फळी या रोडच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याचे काम सुरू आहे. नियमानुसार हे काम मजुरांकडून करून घ्यायचे असतानासुद्धा इथे हे काम जेसीबी मार्फत केले जात असल्यामुळे नव्यानेच कित्येक वर्षानंतर झालेला रस्ता खराब होत आहे त्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास होईल म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यामार्फत सरपंच प्रतिनिधी सिताराम पाटील यांनी सामाजिक वनीकरण येथील अधिकारी राठोड मॅडम यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधून हे काम मजुरांमार्फत करा अशी विनंती केली असता राठोड मॅडमनी शासकीय कामात अडथळा आणला अशी तुमच्यावर केस करू अशी अरेरावीची भाषा करत शिव्या दिल्या. त्यामुळे सिताराम पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी हे काम ताबडतोब थांबवण्यात येऊन संबंधित अधिकारी, गुत्तेदार, ठेकेदारावर कार्यवाही करावी नाहीतर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसु. असे निवेदन हदगाव तहसीलदार यांना दिले त्यावेळी त्यांच्यासोबत काशिनाथ कदम, परमेश्वर कदम, माधव कदम, शिवाजी कदम, इत्यादी उपस्थित होते.