
प्रतिनिधी: लता फाळके /हदगाव
लोकहीत महाराष्ट्र हदगाव ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/BU0olst0ERvGH3rjMfjoIT
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष मोंन्टीसिंघ जहागीरदार यांच्या आदेशानुसार व हदगाव तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी फळाचे बॉक्स जिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर ढगे साहेब यांना स्वाधीन केल्याचे चित्र दिसून आले. गत सात वर्षानंतर प्रथमच हदगाव तालुक्यात श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होताना दिसून येत असल्याचे पाहावयास मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात फळांचे रुग्णांना वाटण्यासाठी वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर ढगे साहेब व त्यांच्या स्टॉप च्या स्वाधीन करण्यात आल्या. यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे, मनसेचे सोनू भाऊ चव्हाण, आराध्य पाटील बाभळीकर,रमेश पाटील कदम, शैलेश शिरफुले,अमोल पाटील कदम, वैभव पाटील कदम, पांडू वानखेडे, प्रथमेश देशमुख, आकाश जंकुट,अनिकेत जंकुट,मारोती पवार, सौरभ मस्के,सय्यद खाजा, सतीश कदम, वैभव कदम, अनिल कदम, माणिक कदम, सूरज कदम, स्वप्नील कदम, शिवराज कदम, सूरज कदम, आबाराव कदम,महेश कदम, व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित असल्याचे दिसून आले.
