
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने महाराष्ट्राचे लोकनेते माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माणुसकी जोपासत अविरत सेवा कार्य केलेल्या शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस-महसूल प्रशासन, पत्रकार बांधव, महावितरण, महानिर्मितीचे अधिकारी – कर्मचारी, शिक्षक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कोविड सेंटर उभारणाऱ्या संस्था, विविध सेवाकार्य केलेल्या संस्था व सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, स्मशान भूमी रक्षक आदी सर्व सेवाधर्म वाहकांचा गौरव सन्मान कृतज्ञता समारोह कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह हदगाव येथे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कदम वायपणकर यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भीतीने हरवलेली माणुसकी दुसऱ्या लाटेत सेवेची वाहक बनून कार्यरत होती.अशा सर्व सेवाभावी वृत्तीचा गौरव करून कृतज्ञता कार्यक्रम होणार आहे,दुसऱ्या लाटेचा सामना करताना उभारलेल्या सेवाधर्म उपक्रमांमध्ये कोरोना योद्याचा सन्मान करण्यात येणार आहे, हदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना मानपत्र प्रमाणपत्र देऊन गौरव सन्मान करण्यात येणार आहे,कार्यक्रमाला उपस्थित राहून कोरोना योद्धाच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी असे आवाहन भगवान कदम विलास माने अविनाश कदम संदीप जाधव शेख रहीम विक्रम शिरसागर नागेश कदम नंदू पाटील नरवाडे आनिल देवसरकर व सर्व पदाधिकारी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद हदगाव तालुकाच्या वतीने करण्यात आले आहे.
