आमदार जळगावकरांनी थेट उपजिल्हा रुग्णालयात जावून घेतला परिस्थिती चा आढावा

लता फाळके/हदगाव


हदगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत सर्वसामान्यांचा बहुतांश तक्रारी येत होत्या. त्यात बाह्यरुग्ण तपासणी ला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने थेट आमदार जवळगावकर यांच्याकडे तक्रार गेल्याने आमदार जवळगावकर यांनी थेट उपजिल्हा रुग्णालय गाठून स्पॉट पंचनामा करत हजेरी पटाची पाहणी केली त्यात अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्‍याचे समोर आल्याने या प्रकरणाचा आमदार जळगावकरांनी खुलासा मागवला आहे.
सध्या च्या परिस्थितीत कोरोना च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे असल्यानंतरही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने याचाच संदर्भ घेत आमदार जवळगावकर यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ मीटिंग बोलण्याच्या वैद्यकीय अधीक्षक यांना सूचना केल्या. त्याचबरोबर सकाळी 9 ते 12 व सायंकाळी चार ते सहा यादरम्यान बाह्य रुग्णांच्या तपासण्या केल्या जातात परंतु मागील अनेक दिवसापासून बाह्यरुग्ण तपासणी करण्यासाठी नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची तक्रार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे करण्यात आली होती या अनुषंगाने आमदार जवळगावकर यांनी वैद्यकीय अधीक्षक यांना या गंभीर प्रकरणाचा जाब विचारून यानंतर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा गर्भित इशाराही दिला त्यामुळे येणाऱ्या काळात बाह्यरुग्ण तपासणी ला नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील यात काही शंका नाही.
त्याच बरोबर वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या रुग्णालयातील येणाऱ्या अडी-अडचणी आमदार जवळगावकर यांच्या कानी घातल्या त्या अनुषंगाने आपले सर्व अडचणी येणाऱ्या काळात तात्काळ मार्गी लागतील असेही आश्वासन आमदार जवळगावकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिले असून आपल्या सर्व अडचणी सोडवल्या जातील परंतु सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा चांगली देत चला गरज व अत्यावश्यक असेल तरच रुग्णांना नांदेडला संदर्भीय करा अन्यथा सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड करू नका अशाही सूचना आमदार जवळगावकर यांनी यादरम्यान वैद्यकीय अधीक्षक यांना दिल्या आहेत.
मागील काही महिन्यापूर्वी रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी आमदार जवळगावकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला आपल्या आमदार निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून अजूनही काही दिवसातच हदगाव उपजिल्हा रुग्णालय ला तीन रुग्णवाहिका व हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाला तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार जवळगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अमित आरसूळ, माजी सभापती तथा नगरसेवक फिरोज पठाण, माजी उपनगराध्यक्ष खदिर खान पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्र्यंबक पाटील ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढगे ,वैद्यकीय अधिकारी प्रदीप स्वामी, उपस्थित होते.
चौकट
आमदार जवळगावकर यांच्याकडून हृदय रूग्णांसाठी मशिनी.
हदगाव उपजिल्हा रुग्णालयात मागील आणि दिवसापासून रुदया संबंधी च्या मशीनच उपलब्ध नव्हत्या ईसीजी ची साधी मशीन हीसुद्धा तिथे वापरात नव्हती याची माहिती प्राप्त होताच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अंदाजे दहा लक्ष रुपये किमतीच्या ईसीजी मशीन, डी फॅब्री लिटर मशीन, मल्टी प्यारा मशीन, या हृदया संबंधित या मशिनी आपल्या निधीतून उपलब्ध करून दिल्याने हृदयाच्या आजाराच्या रुग्णांचा प्राथमिक उपचार या मशिनद्वारे होऊ शकतो त्यामुळे या रुग्णांना ईसीजी काढण्यासाठी आता खासगी रुग्णालयात जाण्याचा तान आमदार जळगावकरांनी दूर केल्याने रुग्णात समाधान व्यक्त होत आहे.