स्व.डॉ वि. मा. तावडे तळणीकर यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबीरास उदंड प्रतिसाद

लता फाळके / हदगाव

मा.सभापती स्व. डॉ. विठ्ठलराव तावडे तळणीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तळणी ता. हदगाव येथे रक्तदान शिबीर डॉ. वि. मा. तावडे प्रतिष्ठान व समस्त गावकरी मंडळी ने आयोजित केले होते. या शिबीरास कोरोना सारख्या प्रतिकुल परिस्थितीतही उदंड प्रतिसाद मिळाला मानवतेच्या दुष्टीने रक्ताचा पडत असलेला तुटवडा भरुन काढण्यासाठी ह्या सामाजिक उपक्रमाची खूप प्रशंसा होत आहे. या शिबीरात तब्बल 61 रक्तदात्यानी रक्तदान केले शिबीर यशस्वीतेसाठी सुमंत तावडे, तुषार देशमुख यांच्यासह गावकरी मंडळी व युवकांनी पुढाकार घेतला.