
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय नेते शेतकर्यांचे कैवारी बाबुराव पाटील कोव्हळीकर यांचे पिंक विमा कंपनी यांच्या विरोधात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा आपल्या निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी यांना दिला आहे सन २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा प्रमाणांत सामोरे जावे लागले हाताचे आलेले सोयाबीन कापूस मुग उडीद इतर काही पिकांचे देखील नुकसान झाले होते तेव्हा काही पिंक विमा कंपनी ने पिंक विमा मंजुर केला पण आजपर्यंत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना त्याचे पैसे अजुनही मिळालेले नाही खरीप हंगामाला सुरुवात देखील झाली तरी पिंक विम्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकरी पहात आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात दोन वर्षांपासून कोरोणाने धुमाकूळ घातला आहे नाही मालाला भाव नाही पिक विमा मिळाला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे भर पावसाळ्यात पिंक विम्याची रक्कम शेतकरी पिक विमा कंपनीला भरत असतो कारण पावसामुळे आपल्या पिकांचे नुकसान झाले तर थोडी का मदत होईल पिक विमा कंपनी आपल्याला मोबदला देईल या असेने भरीत असतों जर का या दोन दिवसांत इफको टोकीयो विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा ४ तारखे पासून बेमुदत आंदोलन हदगाव तहसील कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा लोक नेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांनी दिला आहे.
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
