दिनेश श्रीरामज्वार या छोट्या व्यापाऱ्याने सोशल मीडिया द्वारे मुख्यमंत्र्यांना वाचून दाखवला सर्वसामान्यां च्या दुःखाचा पाढा

नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील छोटे व्यावसायिक दिनेश श्रीरामज्वार यांचा व्यवसाय आहे. पण कोरोना मुळे मागील वर्षी चे कर्ज अजून फिटले च नाहीतर पुन्हा लॉक डाऊन झाले तर मी आणि माझ्यासारखे असंख्य छोटे व्यावसायिक मोडून पडतील अशी भीती दिनेश नी थेट मुख्यमंत्री साहेबांना सोशल मीडिया द्वारे व्यक्त केली.

CMOMaharashtra
प्रति,
मा.श्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

आपल्याला लोकांना जगवायचे आहे की मारायचे आहे ?

कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे , आज negative आलेला व्यक्ती उद्या positive येऊ शकतो ,मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का? WHO ने सुद्धा स्पष्ट केले की कोरोना बरोबर जगावे लागेल. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत त्यांनी जगायचे कसे?
त्यांच्या जगण्याची अगोदर सोय करा आणि नंतरच लॉक डाऊन करा. हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार? आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे कामधंदे व्यवसाय सुरू करण्याची मागणी करतोय. हे पुन्हा लक्षात घ्या राज्य हे घरात बसून खाणाऱ्यांवर अवलंबून नसतो तर कष्टकरी ,श्रमिक,व्यावसायिक यांच्यावर अवलंबून असतो.
वर्षभर कोरोनाने मारले आता तुम्ही लॉकडाऊन करून मारा .प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी आहे कोणी उपाशी मरणार नाही ,तुम्ही कोणती उपाययोजना केली त्यासाठी. तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय लॉकडाऊन करून?
साहेब सर्वसामान्य माणूस कसा जगतो हे आपणाला माहीतच नसेल. जे तुपाशी आहेत त्यांचा विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा. काही दिवसांनी कोरोना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो , तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असतील. नियम कितीही कठोर असू द्या लोकं त्याचे पालन करतील ,पण लॉक डाऊन मुळीच नको! प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे , ज्याला त्रास होईल तो स्वतः दवाखान्यात जाईल ,त्याला कोरोना अगोदर उपासमारीने मारू नका.
आजही राज्यात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ती कमावता आहे आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून आहेत ,विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार , असाच लॉकडाऊन राहिला तर लोकं उपासमारीमुळे आत्महत्या करतील. आपण राज्याचे कुटुंबप्रमुख आहात खूप बारकाईने विचार करा.
लोकं सहकार्य करतील पण पुढे अशीच परिस्थिती राहिली तर आता लोकंही ऐकणार नाहीत , रस्त्यावर उतरतील , तुमच्या गुन्ह्यांना सुद्धा घाबरणार नाहीत. घरात उपाशी राहण्यापेक्षा जेल मध्ये जाऊन किमान दोन वेळेचे जेवण तरी मिळेल.
#आपल्यानिर्णयाचाविचार करा.

लता फाळके /हदगाव