
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव
बऱ्याच वर्षापासून हदगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेला ब्रेक आज निघाला पुर्वीचे मनसेचे जिल्हा सचिव आता शिवसेनेचे नेते डॉ. संजय पवार यांनी मनसेच्या अंतर्गत गटबाजी मुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता त्या नंतर हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मनसे नामशेष झालेली असता काही दिवसापूर्वी भाजप मधून मनसे मध्ये दाखल झालेले बालाजी पाटील कऱ्हाळे यांना पक्षाकडून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली सामाजिक आणी राजकीय क्षेत्रात आपली आक्रमक भूमिका आणी सामन्य जनतेच्या हक्कासाठी सदैव कार्यरत म्हणून ओळख असणाऱ्या बालाजी पाटील कऱ्हाळे यांचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो आज हदगाव शहरात मनसे जिल्हाध्यक्ष मोंन्टी भाऊ झाहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला नांदेड शहरध्यक्ष अब्दुल शफिख , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शक्ती परमार , दिपक स्वामी, अनिकेत परदेशी महेश ठाकूर,रवी इंगळे ,संघा जाधव ,हदगाव तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांच्या उपसतिथी मध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला तर पूर्वी प्रमाणे मनसेची ताकद हदगाव तालुक्यात निर्माण होईल का ? आजचा हदगाव शहरातील मनसेचा पक्ष प्रवेश पाहता मनसेला अच्छे दिन आल्याचे दिसून येते .
