
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव.
हदगांव – तालुक्यातील उमरी भा या गावचे मूळचे रहिवाशी बालासाहेब प्रकाशराव इंगळे यांनी मराठा आरक्षणा साठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले मराठा सेवक हडसनी गावचे दत्ता पाटील हडसनिकर यांनी केलेले आमरण उपोषण हे 14 दिवस चालले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी दिलेल्या शब्दा मुळे त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यांनाच पाठिम्बा देण्यासाठी मुंबई ला आपल्या सायकल वर गेले बालासाहेब इंगळे. त्यांनी तब्बल 700 किलोमीटर प्रवास सायकलवर केला. आणी आता होणाऱ्या 19 सप्टे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे पण ते सायकल वर जाणार आहेत.
कळंब मध्ये होणाऱ्या मराठा महा मोरच्यासाठी नांदेड वरून 210 किलोमीटर सायकल प्रवास एक अनोखा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. आरक्षण साठी आत्महत्या करू नका यासाठी सायकलवर फिरून करत आहेत मराठा तरुणात जनजागृती पण ते करीत आहेत.
जेंव्हा ते सायकल वर मुंबईला गेले होते तेंव्हा मंत्रालयात त्यांना खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्री गुलाबराव पाटील , दादा भुसे , मा. संजय राठोड , मा. आ. बाळाजीराव कल्याणकर , मा शंभूराज देसाई यांनी सुद्धा भेट घेतली होती.
