
लता फाळके/ हदगाव
विदर्भ – मराठवाडा च्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवर सुरू असलेले पुलाचे बांधकाम पाहण्यासाठी महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस) च्या डॉ. रेखा पाटील यांनी भेट दिली. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करून पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य तसेच पुलाच्या बांधकामाचे सर्वेसर्वा चीतांगराव कदम सर, जामगडे सर, सुभाष जाधव, महेश पाटील सोडेगांवकर, गजानन जाधव व परिसरातील असंख्य मंडळी उपस्थित होते.
