निवघा पोलीस चौकी हद्दीत अवैध धंद्याना उत.

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव

निवघा – गेल्या काही वर्षापासून निवघा पोलीस चौकीच्या हद्दीत अवैध धंद्याना ऊत आला आहे. मोठ्या प्रमाणात अवैध दारू , गुटखा विक्री होत आहे. तर तर मोठ्या प्रमाणात मटक्याचे अड्डे जागोजाग थाटल्या गेले आहेत. याला आळा घालण्याचे अनेकाने प्रयत्न केले. मात्र त्यांना काही अवैध धंदे बंद करण्यात यश आले नाही.
गेल्या अनेक दिवसापासून निवघा शहरात व जवळपासच्या खेड्यात मटका जोरात चालू आहे. तसेच गोळी भांडार च्या नावा खाली गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. परिसरातील १०-१२ खेड्यांना अवैधरित्या गुटख्याचा माल पूर्वीला जातो. तसेच निवघा शहरापासून जवळच असलेल्या कोळी या ठिकाणी खुलेआम मटका बुक्या आहेत. निवघा हे शहर परिषरातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजार पेठ असल्याने १०-१५ खेडे या निवघा शहराला जोडले आहेत. त्यामुळे शहरात नेहमी अविध प्रवाशी वाहतूक व्यवस्थाची कोंडी होत आहे. बेशिस्त पणे वाहने कुठे पण उभे करणे या सर्व अवैध धंद्यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.