

लता फाळके/ हदगांव
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सध्या खेडोपाडी स्वच्छतेचे महत्व सर्वांना कळायला लागले आहे त्यामुळे बऱ्याचशा गावात सर्व गावकरी सहभाग घेवून गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देतांना दिसून येत आहेत त्यातच हदगाव तालुक्यातील फळी हे छोटेसे गाव त्या गावातील नवनिर्वाचित सरपंच सौ.रुखमीनाबाई नाथराव कदम यांचे पुत्र सिताराम पाटील यांनी तसेच ग्रामसेवक कदम साहेब, गजानन कदम, सर्व सदस्य व गावातील सर्व तरुणांनी पुढाकार घेवून
गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहेत गावातील 30 ते 40 युवक दर रविवारी गावातील सात ते दहा या वेळेत नाल्या, रस्ते साफ करून मंदिराचा परिसर स्वच्छ करीत आहेत. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
