चणा खरेदीची मर्यादा वाढवा- बालाजी हेंद्रे

लता फाळके /हदगाव

चणा खरेदीची मर्यादा वाढवा- बालाजी हेंद्रे
शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या चणा खरेदी साठी हेक्टरी दहा क्विंटल ची अट घातलेली आहे ती मर्यादा शिथिल करून चना खरेदी करावा अशी मागणी देळूब येथील प्रगतशील शेतकरी बालाजी हेंद्रे पाटील यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, कंधार, लोहा, किनवट या ठिकाणी किमान आधारभूत किमतीने चना खरेदी करण्यात येत आहे त्यासाठी 15 फेब्रुवारीपासून नोंदणी देखील सुरू झाली आहे परंतु हेक्‍टरी दहा क्विंटल ची अट घातल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत त्यापेक्षा अधिक उत्पन्न काढणार्‍या शेतकऱ्यांनी चणा कुठे विकावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.