कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पन्नास हजार तर कोरोना मुळे मृत्यू झालेल्या च्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत तात्काळ द्या माधवराव पाटील देवसरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र

लता फाळके /हदगाव.

कोवीड अर्थात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या रुग्णांना सरसकट प्रत्येकी 50 हजार रुपये तर कोवीड बाधित मृताच्या नातेवाईकाच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 5 लाख रुपये तात्काळ मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना ई-मेल द्वारे मागणी करण्यात आली आहे.प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये पेशंटची व पेशंटच्या नातेवाईकांची आर्थिक होणारी पिळवणूक थांबवावी सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोवीड विषाणू अर्थात कोरोना व्हायरसच्या दुस-्या लाटेचे दैनंदिन स्वरूप जाहीर केले जात आहे. मागील दोन-तीन महिन्यात तर कोरोना बाधित रुग्ण व मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे शासनाच्या माध्यमातून घोषित होत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य माणूस त्यावर विश्वास ठेवून भयावह अवस्थेत जगत आहे.महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ते स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्वजण या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही विविध प्रसार माध्यमातून जनतेला ऐकायला मिळत आहे. शासनाच्या अधिकृत आरोग्य यंत्रणा आपापली जबाबदारी गतवर्षी प्रमाणेच या कोरोनाच्या दुस-्या लाटेत ही प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.शासकीय दवाखान्यातील सर्व यंत्रणा, मनुष्यबळ कार्यरत असले तरी वाढत्या रुग्णसंख्ये पुढे ही यंत्रणा कोलमडून पडू लागली आहे. परिणामी तुम्ही होम क्वारंटाईन व्हा! , सरकारी रुग्णालयात कोविड साठी आवश्यक अशा रेमदेसीविर इंजेक्शन , फैबिफ्लू सारख्या टॅबलेटची टंचाई, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व खाटा उपलब्ध नाहीत,अपुऱ्या सुविधा असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे सरकार मायबाप समजून आपण महाराष्ट्रातील जनतेचे काळजी करावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या च्या माध्यमातून करण्यात आली आहे.