ऊस तोडीची यंत्रणा वाढवा अन्यथा कारखान्याचे पाणी बंद करण्याचा इशारा…


प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी

लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर च्या ग्रुप ला जॉईन करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1


हादगाव तालुक्यातील हडसणी कार्यक्षेत्रात असलेले सुभाष शुगर या साखर कारखान्याने अद्यापही आपली यंत्रणा वाढवलेली नसून.
ज्या हरडफ ता. हदगाव.
या गावांमधून या कारखान्यास पाणी उपलब्ध होते. त्याच गावाची परवड या कारखान्यांनी या वर्षी केलेली दिसून येत आहे. नदी उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे.
सुभाष शुगर कारखाना येथील काही कर्मचारी आपल्या गावातील यंत्रणा वाढऊन दुसऱ्या गावावर अन्याय करत आहेत की काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.
अगोदरच ओला दुष्काळामुळे हाताला आलेले सोयाबीनचे पीक गमावण्याची शेतकऱ्यावर वेळ आली होती आणि त्यातच कसाबसा उभा टाकलेला ऊस सुद्धा साखर कारखाने नेत नसल्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटामध्ये सापडला आहे. असाच हतबल झालेला शेतकरी आज उद्विग्न होऊन साखर कारखान्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते.
जर तुम्ही यंत्रणा वाढवून आमच्या गावातील ऊस नाही नेला तर आम्ही सुद्धा आमच्या गावातील कारखान्याला जाणारे पाणी बंद करू असा निवेदनावर शेतकऱ्यांनी सज्जड इशारा संबंधित कारखानदारांना दिलेला आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये गावातील ऊस उत्पादक ज्येष्ठ शेतकरी शामरावजी धावंडकर. यशवंतराव पाटील. श्रीधर पाटील. पंजाबराव पाटील. बालाजी पाटील. सुरेश पाटील. मारोतराव पाटील. देवीदास पाटील पारवेकर. सुनील पाटील. मंगेश पाटील. योगेश पाटील. गोविंदराव पाटील. शरद पाटील. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.