देवानंद देशमुख मित्र मंडळाकडून मास्क सॅनेटायझरचे वाटप

प्रतिनिधी:लता फाळके,हदगाव

सर्वत्र कोरोना चा हाहाकार सुरू आहे आरोग्य विभागातिल अनेकांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावीच लागत आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत हदगाव तालुक्यातील ईरापुर येथील देवानंद देशमुख मित्र मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने आज कोळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,सिस्टर व ईतर कर्मचार्यांना मास्क,सॅनिटायझर ,हॅन्ड ग्लोज
अश्या सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी
आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी निलेश आडे,औषध निर्माण अधिकारी दिपके समुदाय अधिकारी धनंजय देवमाने युवा नेते देवानंद देशमुख पलाश देशमुख राहुल देशमुख सखाराम देशमुख ज्ञानेश्वर देशमुख मंगेश देशमुख व आरोग्य सेवक ईतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
युवा नेते देवानंद देशमुख यांनी कोळी तळणी परिसरमध्ये कोविड जनजागृती करणे सुरु केले.