

प्रतिनिधी:लता फाळके
कोरना संसर्ग विषाणूच्या धर्तीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तुच्या किंमती मोठया प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य व मोलमजुरी करणाऱ्यांचे अतोनात हाल होत असल्यामुळे रेशन कार्डवर इतर वस्तु बरोबरच साखर,तेल व डाळीचे देखील तात्काळ वाटप केले जावे अशी मागणी सजग भ्रष्टाचार निर्मूलन महासंघाचे हदगाव तालुका अध्यक्ष प्रशांत सिंगनवाड यांनी तहसीलदारांना एका निवेदनात व्दारे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरना च्या सध्य परिस्थितीत मोल मजुरी करनारे नागरीकांचे काम बंद असून त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातच किराणा मालाच्या किमती भरमसाठ वाढल्याने मजुर व सामान्य नागरिक यांच्या पुढे खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपन या सर्व परस्थितीचा विचार. करून रेशन कार्डवर इतर साहित्या बरोबरच साखर,तेल व डाळीचे देखील वाटप तात्काळ करण्याची सोय करावी.असे प्रशांत सिंगनवाड यांनी मागणी केली आहे.
