अज्ञात युवकाचा वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार,वैद्यकीय अधिकारी जागीच ठार ; आरोपी पसार

  • Post author:
  • Post category:इतर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

         

श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकिय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे वय – ४५ वर्ष पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने येऊन डॉक्टरच्या छातीमध्ये एक ते तर पाठीमध्ये तीन अशा एकुण ४ गोळ्या झाडल्याची घटना घडली यामध्ये डॉ.धर्मकारे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती उमरखेड शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रमेश मांडण यांनी दिली तर घटनास्थळावर वरून आरोपी पसार होण्यास यशस्वी झाला यामुळे शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, डॉ. हनुमंत धर्मकारे मागील ७ वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत होते.
याशिवाय त्यांचा उमरखेड बसस्थानकाच्या समोर खाजगी बाल रुग्णालय होता.

गेल्या ७ वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय सर्वसमावेशक राहिलेली आहे या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला एक गोळी तर पाठीमागे तीन गोळ्या अशा एकूण चार गोळ्या त्या युवकाने त्यांच्यावर झाडल्या यामध्ये डॉ.धर्मकारे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

शहरातील शासकीय उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी त्यांची नेहमीच बैठक असायची आज सायंकाळी ५ वाजताच सुमारास आपल्या मोटर सायकलने
ते त्यांच्या खाजगी दवाखानाकडे जात असताना एक अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून छातीमध्ये गोळ्या झाडल्या, त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अज्ञात युवक त्याच्या शाईन गाडीने भरधाव वेगाने पसार झाला असल्याचे यावेळी प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले.यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमेश मांडण यांनी दिली.

ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरली यावेळी नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली विशेष म्हणजे आज माजी गृह राज्यमंत्री आमदार रणजीत पाटील हे उमरखेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनाही ही घटना समजली त्यांनी यावेळी घटनास्थळी भेट दिली त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने ,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा याशिवाय माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

दरम्यानच्या काळात वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे मागील आठ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी उमरखेड शहरात तणावग्रस्त स्थिती असताना त्यातच उमरखेड पोलिस बंदोबस्तात असताना सुद्धा भर रस्त्यावर हा गोळीबार झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिकांचा असंतोष होत आहे.