यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती मध्ये 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ,गणेश भक्तांना गणेश मूर्ती घेण्यासाठी मोजावे लागतील अधिक पैसे

प्रवीण जोशी – प्रतिनिधी


बाप्पांच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेशभक्त.. आता गणेश मूर्ती इकडेतिकडे पाहणी करत आहेत या बापांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांना यावर्षी त्यांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे संभाव्य दिसत आहे. भक्तांचा हा उत्सव म्हणजे धुमधडाक्यात साजरा होणारा हा उत्सव आहे. मागील कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झालं. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, वाढत्या महागाई मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी महागलेल्या असतील,असे मूर्तिकार सांगतात.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे गणेश भक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.