
शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून ते सध्या गुजरातच्या एका पंच तारांकित हॉटेलमध्ये आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्यासोबत १२ हून अधिक आमदार असून आता शिवसेनेत फूट अटळ आहे. या घडामोडींमुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्ली दौरा आटोपता घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे पंचतारांकित हॉटेलमध्ये असून त्या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त आहे. यादरम्यान भाजपचे नेतेही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे अशी माहिती उपलब्ध होत आहे.
