कोंबड बाजारावर धाड

  • Post author:
  • Post category:वणी

खंडणी जंगल शीवारात दोन आरोपी अटकमारेगाव,दि.12 तालुक्यातील खंडणी जंगल शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकून 2 आरोपींसह मुद्देमाल जप्त केला. ही घटना 11फेब्रुवारी रोज शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पोलीसांनी धाड टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती आहे.मारेगाव तालुक्यातील खंडणी जंगल शिवारात पैज लावून कोंबडा बाजार भरविला जात आहे, अशी माहिती पोलिसांना सुत्राकडून मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून बाजारावर धाड टाकली. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन दोन आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यावेळी पोलिसांनी 29 हजार रूपये रोख, असा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई मारेगाव पोलिसांनी करून केली असुन याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत