

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, मुकुटबन
. मुकुटबन येथे प्राणी व सर्प मित्र टीम व ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन निसर्गमित्र सर्पमित्र नितीन मनवर यांनी केले या कार्यक्रम मध्ये प्रमुख अतिथी सरपंच सौ.मीना अरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार, सुनील उत्तरवार, जगदीश अरमुरवार, पंकज मुद्दमवार, सुधाकर कल्लूरवार, संजय पारशिवे, राजेश्वर कुंटावार गुरुकुल कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक सुभाष गजभिये प्रमुख अतिथी उपस्थित होते जगदीश अरमुरवार यांनी वृक्षारोपणाचे फायदे सांगितले व कार्यक्रमाचे आयोजन मुकुटबन व मधील निसर्गमित्र व सर्पमित्र संतोष गुमुलवार, संदीप धोटे, जगदिश कुडलवार , राजेश कुंटावार, शंकर कुंटावार, तन्मय कुंटावार, नयन फुलबाईनवार व संस्थेचे सचिव नितीन मनवर यांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले तर अध्यक्ष राजेश आंबेकर यांचे मार्गदर्शन मिळाले तर आभार प्रदर्शन संतोष गुमुलवार यांनी केले.
