वणीत पत्ते जुगारावर डिबी पथकाची सिनेस्टाइल धाड, सात आरोपींना अटक तर घरमालक फरार

1

वणी :नितेश ताजने

शहरातील सावरकर चौक परिसरातील एका घरात सुरु असलेल्या पत्ता जुगारावर डिबी पथकाने सिनेस्टाइल धाड टाकुन सात जनांना ताब्यात घेतले असुन घरमालक फरार होण्यात यशस्वी झाला असुन पोलीस शोध घेत आहे. सदरची कारवाई आज दि.३ ऑगस्टला दुपारी ४ वाजताचे सुमारास करण्यात आली असून या कारवाईत अनेक मोबाईल, गाद्या व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.