स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्य साधून कस्तुरबा गांधी कन्या शाळेत रांगोळी स्पर्धे सह विविध कार्यक्रमाचे आयोजन


(प्रतिनिधी ढाणकी प्रवीण जोशी)


स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त साधून ढाणकी येथील कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये मुलीचा आवडता विषय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते रांगोळी ही महाराष्ट्राची एक खूप जुनी आणि परंपरागत प्रथा आहे या स्पर्धेला मुलींनी सुद्धा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही विशेष बाब म्हणावी लागेल तसेच दिनांक १२ रोजी ध्वजारोहणानंतर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर अनेक स्पर्धा घेण्यात आल्या सुंदर रांगोळ्यांनी शाळेचा परिसर फुलून गेला होता रांगोळी स्पर्धाचे आयोजन श्रीमती पी ए वासे व्ही ए कमठाणे आर सी वानोळे एन व्ही अन्नछत्रे व कलाशिक्षक व्ही व्ही गुंडमवार यांनी केले विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व विशद करणाऱ्या रांगोळ्या काढल्या यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रतापजी भोस यांनी शाळेला भेट देऊन मुलींनी साकारलेल्या रांगोळ्या बघून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले तसेच त्यांच्यासोबत गोपनीय शाखेचे कर्मचारी दत्तात्रय कुसराम उपस्थित होते तसेच त्यानंतर गीत गायन स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले व देशभक्तीपर गीतांमुळे विद्यार्थिनीमध्ये उत्साह दिसत होता बी पी सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए ए आलोने यांनी केले तर आभार राहुल चंद्रे यांनी मांनले तर ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्राचार्य श्रीमती एस बी शिंदे यांच्या हस्ते झाला तर पर्यवेक्षक प्रा दिपक वाघमारे व सर्व शाळेच्या कर्मचारी वृंदाची यावेळी उपस्थिती होती आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडला