उमरखेड महागाव मतदारांचा निर्धार किसनदा वानखेडेच होणार आमचा आमदार

प्रतिनिधी-प्रवीण जोशी


विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता तापले असून उमरखेड महागाव मतदार संघात किसनराव वानखेडे यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसतो आहे. मतदार संघातील प्रत्येक गावाचा दौरा करीत किसनराव वानखेडे हे ग्रामस्थांची संवाद साधत आहेत. यावेळी मतदारसंघात एक अनुभवी व व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा चंग मतदाराणी बांधलेला दिसतो . उमरखेड महागाव मतदारांचा निर्धार आणि किसनदा आमचे आमदार अशी चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात होऊ लागली आहे.
किसनराव वानखेडे यांनी सुद्धा आपण मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अशी ठीक ठीक ग्वाही देत प्रचार करत आहे. विधानसभा मतदानासाठी जेमतेम काही दिवसाचा कालावधी उरला असून आता प्रचाराने मोठ्या प्रमाणात वेग घेतला. प्रचारादरम्यान किसनराव वानखेडे मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी वस्तीवर जाऊन पोहोचले मुळात किसनराव वानखेडे व पक्षाचे कार्यकर्ते व संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या संपर्कात राहिले आहे. भारतीय जनता पार्टी यांचे माध्यमातून किसनराव वानखेडे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत मात्र ते आपल्याच घरातील कुणीतरी आहेत अशी भावना प्रत्येक शेतकरी आणि कष्टकऱ्यांमध्ये निर्माण झालेली दिसते. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये त्यांना मिळणारे प्रोत्साहन यांचे होणारे वाजत गाजत स्वागत आणि मतदान करण्याचे दिले जाणारे आश्वासन यामुळे किसनराव वानखेडे यांनी विरोधाकापेक्षा प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्या दरम्यान जमणारी गर्दी शिवाय तयार होणारे सहानुभूतीचे वातावरण त्यामुळे लोकांना कधी नव्हे ते निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच विश्वासाचा उमेदवार दिसून आला. यातून उमरखेड महागाव मतदारांचा निर्धार किसनदा वानखेडे होणार आमदार अशा नारा सगळीकडे फिरू लागला आहे. गावकऱ्यांकडून मिळणारे प्रोत्साहन माता भगिनींचा मिळणारा आशीर्वाद हे बघून भारावून गेलेल्या किसनदा वानखेडे यांनी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही ग्वाही देत आहे.