भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून कुणबी समाजाविषयी वापरलेल्या गैरउद्‌गाराचा निषेध

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बोदकुरवार यांच्या अति निकट असलेल्या सुधीर साळी नावाच्या पदाधिकारी व्यक्तीने कुणबी पाटील समाजाविषयी अश्लील भाष्य करून, कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यास अपमानित केले। समस्त कुणबी समाजाब‌द्दल बेभानपणे बोलतांना सुधीर साळी नावाचा व्यक्ती हा आमची सत्ता आहे, पुढेही ही सता आमचीच राहील, तुम्ही वाट्टेल तेथे तक्रार करा! आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही! असेही भाजप उमेदवारांच्या प्रचार मंडपात बोलत होता.

ही घटना घडल्या नंतर वणी शहरातील अनेक कुणबी पाटील नागरिक व समाज संघटनेच्या नेत्यांनी सुधीर साळी यांच्या अटकेची मागणी केली, पोलिसात तक्रारही केली. परंतु दडपशाही ये राजकारण करून भाजपच्या उमेदवारांनी साळी यांना अटकेपासून दूर ठेवीत संरक्षण दिले.

जात पात धर्म पंथाच्या नावावर मुद्दाम भांडण उकरून काढून, दंगल घडविण्याचा मनसुबा भाजप चे नेते करू पाहत आहेत. हा प्रकार लोकशाहीत घातक आहे, ऐन निवडणुकीत जाती पाती बदल नको ते भाष्य करून, ही निवडणूकच वेगळ्या मार्गाने कशी घेऊन जाता येईल, असे षडयंत्र भाजपने व भाजपच्या नेत्यानी व कार्यकर्त्यांनी सुरु करून, हुकूमशाही स्थापनेचा प्रकार चालविला आहे. या करिता आज मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित ॲड प्रफुल मानकर अध्यक्ष – जिल्हा काँग्रेस कमिटी,यवतमाळ,कीर्ती बाबू गांधी- मा आमदार,वर्षाताई निकम – जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी श प ,जावेद अन्सारी – सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,राजेंद्र गायकवाड – संपर्क प्रमुख शिवसेना उ बा ठा,प्रकाश शर्मा – सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी,विनोद संगीतराव – सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी,जाफर खान – उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी ,प्रल्हाद सिडाम,हर्षल मिलमिले उपस्थित होते