लालगुडा ग्राम पंचायतीवर वंचितच्या सहकार्याने शिवसेनेचा (उबाठा) झेंडा, नवनिर्वाचित सरपंच सौ. गीताताई उपरे यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वागत

वणी :-प्रतिनीधी नितेश ताजणे

वणी येथून जवळच असलेल्या लालगुडा ग्राम पंचयतीवर वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा रोवला असून सौ गीताताई उपरे यांची सरपंचपदावर निवड झाल्याने वंचितच्या पदाधिकार्याकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वंचित सेनेच्या या प्रयोगाने संपूर्ण तालुक्यातील कार्यकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लालगुडा ग्राम पंचायत ही अगदी वणी शहराला लागून असून एक प्रतिष्ठेची ग्राम पंचायत आहे. येथील सरपंच धनराज चालकुरे यांचे अल्पश्या आजाराने निधन झाल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. ११ सदस्यीय असलेल्या या ग्राम पंचयतीमध्ये १० सदस्य सदस्यपदावर कार्यरत असताना सरपंच निवडीची प्रक्रिया आज पूर्ण करून घेतली असता सौ. गीताताई उपरे व सौ. वंदनाताई चामाटे यांनी सरपंच पदाच्या निवडीसाठी आपले नामांकन निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरले असता यातील रत्नमालाताई चालखूरे, वैशालीताई नगराळे , पूनमताई मंदे, शारदाताई मेश्रामसह सौ गीताताई उपरे यांच्या बाजूला मते पडली तर ४ सदस्यांची मते सौ. चामाटे यांना पडली आणि एक सदस्य गैरहजर असल्याने ५ मते पडलेल्या सौ. उपरे यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांना दिले असून यावेळी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच्या शिवसेना नेते संजय देरकर, सौ. गीताताई उपरे यांच्या निवास्थानी जाऊन सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हामहासचिव मिलिंद पाटील, वणी विधान सभा अध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन महिला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्षा सौ. अर्चनाताई कांबळे, जिल्हा महासचिव वैशालीताई गायकवाड, शहराध्यक्षा सौ. अर्चनाताई नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते
.