श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगावच्या वतिने आयोजित “परिसंवाद”कार्यक्रमाचे आयोजन…

   

श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगाव व्दारा आयोजित ,”परिसंवाद”हा कार्यक्रम घेण्यात आला .त्या कार्यक्रमाचा विषय “समान नागरी कायदा” हा होता,ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे अॅड.आनंद देशपांडे नागपुर (खंडपिठ मुंबई ) ,मंचाचे सचिव श्री.मेघ:श्याम चांदे(मामा) हे व्यासपिठावर उपस्थित होते,प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ.अनिल वर्मा ह्यांनी शाल ,श्रीफळ देउन केले ,दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी तसेच पत्रकार बंधु,वकील संघ,व मोठ्या प्रमाणात शहरातील प्रतिष्ठीत बंधु भगिनी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड.आंनद देशपांडे ह्यानी अभ्यास पुर्वक विषयाची माहीती दिली तसेच त्यांनी सांगितले कि हा जो समान नागरी कायदा आहे ,त्या कायद्यासाठी आपन सगळ्यांनी धर्म ,जातीला न पाहता बाकीच्या विषया कडे लक्ष केंद्रित केले पाहीजे,त्यासाठी सगळ्यात आधी आपण सगळे भारतीय आहोत हे पाहणे महत्वाचे आहे.

समान नागरी कायद्याच्या संदर्भात प्रामुख्याने मते मांडणारे अॅड.अफसर अली,अंकुश मुनेश्वर,कॉग्रेंसचे अरविंद वाढोणकर,भाजपा चे अॅड. प्रफुल चव्हाण,किरण कुमरे अॅड.प्रितेश वर्मा,अॅड.रौशनी वानोडे/कामडी,अॅड.वैभव पंडित आणि ईतर ही मान्यवरांनी आप आपली मते मांडली,ह्या मतां मध्दे् त्यात प्रामुख्याने अॅड.रौशनी वानोडे/कामडी ह्यांनी महीलां साठी समान नागरी कायदा किती गरजेचा आहे व ह्याचे फायदे किती आहे ते ही थोडक्यात समजावून सांगितले,तसेच कोणत्याही राजकीय मंडळी ला उद्देश्युन न सांगता त्यांच स्पष्ट मत होत की ,मा.पंतप्रधान मोदीजींच्या मुखातुन हे समान नागरी कायद्याचे जेंव्हापासून सांगण्यात आले आहे,तेंव्हापासुन विविध राजकीय लोकांनी त्याचे विषयांतर केले आहे ,तसे न करता आपन सगळे ह्या कायद्यासाठी आपले सहमत करावे,जेणेकरुन कोनालाही कोणता पक्षपात करता येनार नाही,असे ही त्यांनी आपले मत दिले. ह्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात राजेश काळे सर आपले मत मांडताना सांगितले कि हा “परिसंवाद ” सर्व पक्षाच्या लोकांसाठी होता,ह्या विचार मंथनातुन जे अमृत निघेल ते लोक कल्याणसाठी द्यायचे आणि जे विष निघेल ते मंचाने पचवायचे ,ह्या कार्यक्रमासाठी राळेगावचे मा.नगराध्यक्ष रविंद्र शेराम,उपाध्यक्ष जानराव भाऊ गिरी ,तालुका संघचालक भुपेंद्रभाई कारीया,रमेश जव्हेरी ,डॉ.कुणाल भोयर,कृष्णाजी राऊळकर,माजी तहसिलदार मधुकरजी गेडाम,सौ.संतोषीताई वर्मा,सौ.मिनाक्षीताई येसेकर,प्रा.प्रभाकर लाकडे,मेंडुलकर सर ,राजजी वर्मा,शुभम नरमशेट्टीवार व राळेगाव शहरातील प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती होती , कार्यक्रमाचे संचालन राजेशजी काळे ह्यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सविताताई पोटदुखे ह्यांनी केले सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समारोप झाला.कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट झाल्याची चर्चा श्रोते करित होते.