
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधीची निवड करण्याबाबत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था म..र्या नं. र. ५७५
आष्टोणा च्यावतीने संचालक सभासदांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री किसनराव दादाजी पावडे यांची बँक प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत सोसायटीचे संचालक सुरेशराव येरगुडे, रमेशराव टोंगे, रामभाऊ गाढवे, धीरजपाटील काकडे, सचिन गोफने, प्रशांत पावडे, दरवेश्वर भोंगळे, शशिकलाताई सु गोखरे या ८ संचालक मंडळींनी श्री पावडे यांना मतदान केले.
श्री पावडे यांच्या निवडीसाठी माननीय श्री. पंढरीनाथजी पाटील काकडे, श्री. डॉ. सुरेशराव महाजन, श्री. अनिलरावजी राजुरकर यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी नवनिर्वाचित बँक प्रतिनिधी पावडे यांचे ग्रा. पं. उपसरपंच शंकर वरघट व ग्रा. पं. सदस्य रविंद्र कन्नाके यांनी गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
