
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसभा निवडणूकीपुर्वी अनेक घडामोडी घडल्या. २५ वर्षापासून खासदार राहिलेल्या खा. भावना गवळी यांना उमेदवारी देण्याऐवजी राजश्री महल्ले पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्याने अनेक इच्छुकांची निराशा झाली. अनेक दिग्गज मतदार संघात असताना नांदेडच्या रहिवाशी असलेल्या राजश्री महल्ले यांना उमेदवारी दिल्याने बाहेरच पार्सल बाहेर पाठवा असा मतदारांनामध्ये सूर उमटू लागला आहे. त्यातच राजश्री पाटील यांच्या प्रचाराची धूरा कुठलाही अनुभव नसताना तसेच जातीय समिकरणामध्ये पाटील समाजाचे अनेक अनुभवी व जेष्ठ पदाधिकारी असताना वाशीम जिल्ह्याची धुरा स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या सुपूत्राकडे दिल्याने खदखद व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. त्याचाच परिपाक दि. १० रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आला. कुठलाही प्रोटोकॉल न पाळता ज्ञायक पाटणी यांनी पहिल्या रांगेत आपली खुर्ची सांभाळत जेष्ठांवर अन्याय केल्याच्या चर्चा सभास्थळी चर्चिल्या जात होत्या आणि खुर्चीसाठी वादही झाला. पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळणार असे सर्वांना वाटत असताना ऐनवेळी शेवटच्या दिवशी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ हा भाजपाच्या वाट्याला जाईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाईल अशी अपेक्षा ठेवून अनेकांनी गुडघ्याला बांशीग बांधून आपणच ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीरही केले होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे गेली. त्यामुळे असे असताना उमेदवारी फक्त आणि फक्त विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच मिळायला पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही. भाजपाच्या अंतर्गत सव्र्व्हेत भावना गवळी यांना लोकांची पसंती नसल्याचे कारण पुढे करत त्यांची ऐनवेळी उमेदवारी नाकारली. कुठल्याच सव्र्व्हेमध्ये राजश्री पाटील महल्ले यांचे नाव नसतानाही ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळाल्याने मतदार संघात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. मात्र, पक्षादेश शिरसंधान माणून काही अंशी भाजपा व महायुतीतील घटक पक्ष कामालाही लागले. परंतु २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाचा प्रचार प्रसार कास्पाती कालावधी मोजकाच असल्याने प्रत्येक घरापर्यंत आणि कार्यकत्यांपर्यंत पोहचणे राजश्री महल्ले यांना शक्य नाही. असे असताना भाजपाचे विद्यमान आमदार, वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर सर्व दारोमदार असल्याने राजश्री महल्ले यांच्या प्रचार टिमने वाशीम जिल्ह्याची धुरा स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपूत्र ज्ञायक पाटणी यांच्याकडे दिल्याने भाजपाचेच जेष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. ज्यांनी पक्षात आपली पुर्ण हयात घालवली. घराघरापर्यंत पोहचलेले असताना तसेच कार्यत्र्त्यांची मोठी फळी असलेल्या अनेकांना डावलून नवख्या आणि कुठलाही अनुभव नसलेल्या २५ वर्षाच्या युवकाच्या हातात लोकसभा प्रचाराची धूरा देणे कितपत योग्य आहे. यामुळे शिवसेना-महायुतीच्या उमेदवार राजश्री महल्ले पराभवाच्या दिशेने आगेकूच करीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी भाजपा आग्रही असताना जागा वाटपामध्ये शिंदेही याच जागेसाठी आग्रही होते. या सर्व घडामोडी घडत असताना मुख्य दावेदार वगळून नांदेडच्या रहिवाशी आणि यवतमाळच्या माहेरवासीन असलेल्या राजश्री महल्ले यांना उमेदवारी दिली खरी मात्र, त्यांचे पती हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे जर खरचं कर्तुत्ववान असते तर त्यांना हिंगोलीतून विरोध झालाच नसता. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केलीच नसती. तरीही यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार व इतर पदाधिकाऱ्यांनी राजश्री महल्ले यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असे बातमीदारांकडून कळते आहे. पण भाजपाला हेमंत पाटील एवढे प्रिय असते तर त्यांनी हिंगोलीतूनच हेमंत पाटील यांना निवडून आणले असते. पुढील काळामध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ हा भविष्यात भाजपाला हवा असल्याने भाजपाकडूनच राजश्री महल्ले यांना निवडणूकीत पराभूत करण्याकरीता व्यवस्थित फिल्डींग लावल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात भाजपाला उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे पदाधिकारी मनाने सोबत असल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी मात्र, दुरुन डोंगर साजरा अशा प्रकारचे दिसून येत आहेत. राजश्री महल्ले यांच्या
उमेदवारीवरून अनेक मतभेद आहेत. २५ वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करून भाजपाला हा मतदार संघ पाहिजे होता. असे न झाल्याने भाजपाच्या आशेवर पाणी फिरले. भविष्यात राजश्री महल्ले जर निवडून आल्या तर शिवसेनेचा दावा कायम राहत असल्याने राजश्री महल्ले यांचा पराभव भाजपासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.
