ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे कर्मचारी पुंडलिकराव लोणबले यांची सेवानिवृत्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे कर्मचारी पुंडलिकराव लोणबले हे शासनाचे नियतकालानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांची अखंडितपणे ३२ वर्षे सेवा गावाला लाभली.त्याचे कार्यकाळात अनेक लोकोपयोगी कामे झाली.
त्यांच्या कामामुळे ग्रामपंचायत चा नावलौकिक वाढला. याप्रसंगी त्यांचा सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे सचिव सुनील येंगडे सदस्य प्रसाद निकुरे, प्रतिभाताई सुनील मोहर्ले,सुषमाताई जवादे,मालाताई लोणबले, सीमाताई चुके, रोजगार सेवक धनराज तोडसाम आशा वर्कर सुशीला मेश्राम व चाचोराचे माजी सरपंच वैकुंठ मांडेकर,मंगी येथील सरपंच सचीन टोंग, रमेशभाउ सरोदे व नागरिकांचे हस्ते सत्कार करण्यात आला.