
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
गोंडवाना गणतंत्र समाज व्यवस्था मधील क्रांतिकारक देशभक्त आदिवासी समाजातील वीरपुत्र बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राळेगाव तालुक्यातील चिकना येथे “‘ आदिवासी समाज प्रबोधन “‘ कार्यक्रमाचे आयोजन तिरु वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि तिरु हर्षल आडे जिल्हा संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते —– कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी हे होते तर “‘ आदिवासी समाज प्रबोधन “‘ करण्यासाठी मुख्य मार्गदर्शक मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांची उपस्थिती होती कार्यक्रमात सहभागी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख अतिथी तिरु विठ्ठलराव धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ, राळेगाव विधानसभा प्रमुख मदनभाऊ कुमरे गोंडवाना गणतंत्र पार्टी,तिरु वसंतराव सोयाम जिल्हा संपर्कप्रमुख कार्यक्रमाचे उद्घाटक स्वामी पुनवटकर पोलिस पाटील चिखना विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) ज्ञानेश्वर कुमरे जिल्हा कार्याध्यक्ष तिरु राजेंद्र येडमे जिल्हा उपाध्यक्ष, ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष, चिंतामणराव तुमराम जिल्हा संघटक, कलावती ऊईके तालुका उपाध्यक्ष कळंब आणि ताराबाई सोयाम, सरपंच ग्रामपंचायत आंजी हे सर्व मान्यवर उपस्थित होते. आदिवासी समाजातील लोकांचे शोषण इंग्रज शासन तर करतं होतेच परंतु आजच्या काळात या देशात आणि राज्यात मुठभर राजकीय पक्षाचे पांढरपेशा विचारांचे पुढारी आदिवासी समाजातील लोकांना गुलामगिरी ची वागणूक देत आहे हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आम्ही पाहतो हे या देशाचे दुर्दैव आहे ह्या भावना आदिवासी समाज प्रबोधन करताना मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांनी व्यक्त केल्या आहे.* – गोंडवाना गणतंत्र पार्टी तालुका शाखा राळेगाव आणि चिखना येथील समाज बांधवांनी विर बाबुराव शेडमाके यांच्या कार्याची माहिती समाजातील लोकांना व्हावी यासाठी आदिवासी समाज प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सहभागी सावंगी येथील कुसुमबाई मरस्कोले आणि समाज बांधव आंजी येथील ताराबाई सोयाम आणि सर्व महिला समाज जागजई येथील मंगेश सराटे आणि आणि महिला पुरुष, दापोरी येथील, शीतल सलामे आणि महिला पुरुष बांधव, कीनवट, सावनेर, लाडकी येथील राजुभाऊ केराम आणि सर्व महिला पुरुष बांधव वाऱ्हा येथील समाज बांधव यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन जयंती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला – *कार्यक्रम चे सुत्रसंचलन संतोष आडे सावंगी आणि अंकुश सलाम दापोरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली तलांडे तालुका सचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांनी केले आहे.
