
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दि 01 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक तसेच न्यू ए्ज्यूकेशन सोसायटीचे माजी मानद सचिव स्व.केशवराव चिरडे काकाजी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून राळेगाव शहरातील मुख्य परिसर सफाई,रुग्णालयात फळ वाटप, रस्ता सुरक्षा व मतदार जनजागृती या सर्व उपक्रमा चे आयोजन शाळेतील स्व. केशवराव चिरडे स्काऊट गाईडपथक,राष्ट्रीय छात्र सेना (NCC),राष्ट्रीय सेवा योजना, रोव्हर पथक,राष्ट्रीय हरित सेना, प्रहारी गट यांच्या माध्यमातून करण्यात आले या उपक्रमास शाळेतील शिक्षक सूरज आफुने, प्रा.प्रविण चौधरी ,प्रा.रवि चिकाटे, कु. रेखा कुमरे, कु सोनाली काळे, हरित सेना प्रभारी गोपाल बुरले, किशोर उईके यांनी सहकार्य केले. या उपक्रमास मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे , उप मुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे, शिफ्ट इन्चार्ज अरुण कामनापुरे तथा शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,व शिक्षिका यांनी केले..
