22 हजारांची लाच घेताना बी डी ओ ला अटक

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव यांना लाच मागितल्या प्रकारणी रंगेहात पकडण्यात आले.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गावातील लाभार्थ्यांचे सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्याने बांधकामाचे कुशल बिल काढण्यासाठी देयकावर सही करण्यासाठी 23500 रुपयांची लाच मागितली होती.अखेर 22000 रुपये देण्याचे ठरले .परंतु लाभार्थ्यांना या अधिकाऱ्याला पैसे द्यायचे नव्हते त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधित विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचत विठ्ठल जाधव यांना रंगेहात अटक करण्यात आली.
सदर कारवाई श्री मारुती जगताप पोलीस अधीक्षक , लाचलुचपत विभाग, अमरावती ,,श्री .देविदास घेवारे अपर पोलीस अधीक्षक ,लाचलुचपत विभाग,शिवलाल भगत ,पोलीस उपअधीक्षक , अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी शिल्पा भरडे ,पोनी प्रवीण बोरकुटे, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, ,पोलीस अंमलदार वैभव जायले, शैलेश कडू ,उपेंद्र थोरात ,चित्रलेखा वानखेडे ,पोलीस उप निरीक्षक प्रदीप बारबुदे, पोलीस हवालदार चंद्रकांत जनबंधु यांनी यशस्वीपणे पार पाडली.