कर्मचारी बेरोजगारांचे प्रश्न गंभीर, राळेगाव येथे प्रशासनाला दिले निवेदन

दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी राळेगाव येथे धिक्कार मोर्चा निघणार

केंद्र व राज्य सरकारने काही दिवसापूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी निमसरकारी खाजगी क्षेत्रातील कर्मचारी बेरोजगार पेन्शनर्स व कामगारावर विपरीत विपरीत परिणाम होणार आहे आहे, त्यांच्या विरोधात 29 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील विविध संघटना एकत्र येऊन येऊन धिक्कार मोर्चा काढणार आहेत, सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे विविध क्षेत्रातील कर्मचारी बेरोजगार शेतकरी यांच्यावर अन्याय होत आहे, याबाबत संघटना वेळोवेळी पाठपुरावा करत असताना फक्त आश्वासने मिळत आहे, त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे 24 सप्टेंबर 2023 रोजी विविध संघटना एकत्र येऊन यवतमाळ येथे संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता, त्याच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून 29 ऑक्टोबर 2023 ला राळेगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबत राळेगाव येथील विविध संवर्गाच्या संघटनांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव, तहसीलदार राळेगाव ,पोलीस निरीक्षक राळेगाव, यांना दिनांक 12 ऑक्टोबरला निवेदन दिलेले आहे निवेदन देतेवेळी धिक्कार मोर्चाचे निमंत्रक मधुकरराव गेडाम, सेवानिवृत्त तहसीलदार. मुख्य संयोजक महेश सोनेकर, शिक्षक संघटना, संयोजक रंजय चौधरी ,विजुक्ता संघटना. संयोजक शंकर मोहूरले शिक्षक आघाडी, संयोजक गजानन बलांद्रे, महसूल .संयोजक गजानन भोयर ,ग्रामसेवक संघटना ,संयोजक भाऊरावजी ठाकरे, जानरावजी रामगडे वाल्मीकराव मेश्राम पेन्शनर संघटना, संयोजक संजय राऊत, आरोग्य संघटना. संयोजिका लताताई माटे अंगणवाडी संघटना, संयोजक जगदीश ठाकरे शिक्षक सेना, संयोजक सागर इंझळकर प्रहार शिक्षक संघटना. संयोजक राजेंद्र दुरबुडे शिक्षक संघटना, संयोजक खेमचंद चिमणे, जि. प. शिक्षक संघटना.
दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी राळेगाव येथे धिक्कार मोर्चा सर्व खातेनिहाय संघटनांनी तसेच शेतकरी बेरोजगार व पेन्शनर्स यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासनाला शक्ती प्रदर्शन दाखवावे अशी विनंती मोर्चाचे निमंत्रक मधुकरराव गेडाम व मुख्य संयोजक महेश सोनेकर यांनी केले आहे.