
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी शहरातील स्वस्त धान्य दुकान येथे एपीएल योजनेअंतर्गत कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले व झालेल्या मराठी नववर्ष गुडी पाडवा निमित्त व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने “आनंदाचा शिधा” दी.१२ एप्रिल बुधवार रोजी वाटप करण्यात आला.राज्य सरकारने १०० रुपयात शिधा वस्तूचे पॅकेज जाहीर केले.यात रवा एक किलो चणाडाळ एक किलो, साखर एक किलो, आणि पामतेल एक लिटर, या खाद्य वस्तूचा समावेश आहे १२ एप्रिल रोजी स्वस्त धान्य दुकानदार रामराव गायकवाड यांनी शिधा वितरित करण्याचे ठरविले होते त्या अनुषंघाने यावेळी ढाणकी नगरपंचायत चे अध्यक्ष सुरेशजी जयस्वाल यांच्या हस्ते आनंदाचा शिधा कीटचे प्रथम येणाऱ्या लाभार्थ्याला देऊन नंतर वाटपाला सुरुवात करण्यात आली
त्याच अनुषंगाने ढाणकी येथे “आनंदाचा शिधा” योजनेअंतर्गत शहरातील लाभधारकांना प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे आनंदाचा शिधा वस्तूंचे वाटप करून स्वस्त धान्य दुकानदार हे शासनाच्या नियमानुसार आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील असे यावेळी रामराव गायकवाड यांनी सांगितले
यावेळी आनंदाचा शिधा किट स्वीकारतांना लाभधारक उपस्थित होते.
