राळेगाव युवा सेना शहर प्रमुख पदी गौरव जिड्डेवार यांची नियुक्ति

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव युवा सेना शहर प्रमुख पदी राळेगाव येथिल युवा व तडफदार शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते गौरव सुनिलराव जिड्डेवार यांची नियुक्ति करण्यात आली , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवा सेना सचिव वरुनजी देसाई विदर्भ संपर्क नेते खा•अरविंद सावंत तसेच विभागीय सचिव सागर देशमुख यांच्या मार्गदर्शना नुसार शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड़ , जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवा सेना यवतमाळ जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर उपजिल्हा प्रमुख मिथुन कुटे व शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे व युवा सेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे यांच्या शिपारशीमुळे राळेगाव येथे २०/१२/२३ ला विश्राम गृहात नियुक्ति पञ देउन नियुक्ति करण्यात आली आहे राळेगाव युवा सेना शहर प्रमुख गौरव जिड्डेवार यांची नियुक्ति करण्यात आली त्यामुळे राळेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले