
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचा कार्यकाळ हा एक वर्षासाठी असल्याने 2024-25 या वर्षाकरीता नविन कार्यकारिणीची निवड करण्याकरिता आज दिनांक 30 जानेवारी विश्रामगृह राळेगाव येथे राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये परंपरेनुसार सर्वानुमते प्रा. मोहन देशमुख दैनिक तरुण भारत चे तालुका पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राचार्य न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव यांची अध्यक्षपदी तर सचिव म्हणून साप्ताहिक राळेगाव नगरी चे संपादक महेश भोयर, उपाध्यक्ष शालीक पाल, उपाध्यक्ष शंकर जोगी आणि सहसचीव म्हणून प्रवीण गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष महेश शेंडे यांनी सर्वांचे आभार मानून नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार डॉ. के. एस. वर्मा होते.या सभेला जेष्ठ पत्रकार प्रकाश मेहता, प्रा. अशोक पिंपरे, राजेश काळे, फिरोज लाखाणी, मंगेश राऊत, प्रमोद गवारकर, राजू काळे, शंकर वरघट, राष्ट्रपाल भोंगाडे, मनोहर बोभाटे, रामू भोयर, सचिन राडे, विशाल मासुरकर, गुड्डू मेहता, गजेंद्र ठुणे, साखरकर, अरविंद तेलंगे सह सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
