

सहसंपादक : रामभाऊ भोयर
हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील रहिवासी असणारे आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून जनावर एकत्र करून ते नागपूर मार्ग हैदराबाद कडे नेत असताना वडकी पोलिसांनी माहिती झाल्यानंतर सदर वाहनाचा पाठलाग करीत त्यांना सिंगल दीप फाटा या ठिकाणी पकडले यातील 54 जनावरांची मुक्तता केली तर चार आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई वडकी पोलिसांनी एक वाजता च्या दरम्यान केली..
हरियाणा राज्यातील मेवात जिल्हा मध्ये येणाऱ्या मुह तालुक्यातील घासडा येथील साद अलीम मेहू वय वर्षे, आसिफ साकिब उर्फ हाजी इकबाल शेख वय 34 राहणार बागपत उत्तर प्रदेश, हासिम शौकत कुरेशी वय वर्षे चाळीस राहणार बागपत उत्तर प्रदेश शादाब शाकिब उर्फ इकबाल वय वर्ष 42 राहणार बागपत उत्तर प्रदेश चार आरोपींनी आर जे 40 जी ए 4266 क्रमांकाच्या कंटेनर या वाहनातून म्हशीचे नर जातीचे 54 माती जातीचे एकनाथ आणि म्हशीचे बछडे असे घेऊन जात असताना वडकी पोलिसांनी पाठलाग करून सिंगल दीप फाट्यावर वाहनाला पकडले आणि त्यातील सर्व जनावरांची मुक्तता केली सोबतच चार व्यक्तींना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी हैदराबाद येथे कत्तलखान्यात नेत असल्याचे सांगितले एकूण चार लाख 40 हजाराची किंमत असलेली जनावर आणि 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा 34 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून चारही आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करीत आहे
