राळेगाव येथे क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांचा शहिद दिवस साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

1857 च्या उठावातील महान योद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी जंगोम दलाची स्थापना करून इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांना इंग्रजांनी देशद्रोही ठरवून दि.21ऑक्टोबर 1858 ला चंद्रपूर येथे पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली. अश्या महान क्रांतीकाराचा 166 वा शहीद दिवस सार्वजनिक बांधकाम विभागा च्या बाजूला असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या तैलचीत्राला पुष्पमाला अर्पण करून शहीद दिवस साजरा करण्यात आला.यावेळी नानाजी कोवे, शंकर कोहचाडे, नितीन मडावी, किशोर उमरतकर, रामचंद्र मेश्राम,अरविंद केराम अंकुश कुमरे, गणेश कुडमते, मधुकर पावले, गजानन तुमराम, रामभाऊ मेश्राम, ससाणे,रणजित परचाके,उपस्थित होते.