
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे लोकेश दिवे व दुर्वेश उमाटे यांच्या पुढाकाराने भाजपा शहर अध्यक्ष तथा जळका धानोरा जिल्हापरिषद सर्कल चे लोकनेते यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली गावात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला, फाटक्याच्या अतिशबाजीत डॉ.कुणाल भोयर यांचे स्वागत करण्यात आले,तसेच वाढदिवसानिमित्त गरजु व अपंग लोकांना/महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले,यावेळी डॉ.कुणाल भोयर यांनी आपले मत मांडताना गावातील लोकांना कोणतेही अडचणी आल्यास कुणाल भोयर सदैव तुमच्या सोबत उभा आहे, ब्लॅंकेट वाटप करतांना गरजु व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत होते,वयाने लहान असला तरी गावाप्रति जी तळमळ आहे ती या सर्व गोष्टी मधून दिसून येते असे नागरिकांमध्ये चर्चा दिसून येते, येपुढेही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम होत राहणार असे लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे सांगण्यात येत आहे,यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवारातील दुर्वेश उमाटे,स्वप्नील ठाकरे,जगदीश उमाटे,गजानन भटकर, धिरज उमाटे, प्रभाकर हुलके,अभिलाष नागपुरे,क्षितिज घायवटे,साहिल वनकर, यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
