
काँग्रेसवरील टीकाकारांवर रोखठोक शब्दांत प्रहार; कार्यकर्त्यांना दिला सकारात्मक संदेश
सहसंपादक: रामभाऊ भोयर
सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील अंतर्गत वाद, कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि काही माजी पदाधिकाऱ्यांच्या पक्षविरोधी भूमिकेवर जोरदार टीका केली.
“पक्ष कधीच संपत नसतो, पक्षाला संपवणारेच शेवटी संपून जातात,” असा पुनःपुन्हा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाशी निष्ठा राखण्याचे आवाहन केले.
पुसनाके म्हणाले की, जे आज पक्षावर बोट ठेवत आहेत, तेच कधीकाळी काँग्रेसच्या जीवावर सत्ता उपभोगून गेले. त्यांनी पक्षाच्या विचारधारेवर चालण्याऐवजी आता टीका करण्याचा मार्ग स्वीकारला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, काँग्रेस ही केवळ राजकीय संघटना नसून गांधी-नेहरू-आंबेडकर यांचा विचारसरणीवर चालणारा चळवळीचा प्रवाह आहे. कार्यकर्त्यांनी तत्वांवर ठाम राहून संवादातून मतभेद सोडवावेत, असा सकारात्मक सल्लाही त्यांनी दिला.
