
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नागरिकांमध्ये राष्ट्रभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी राळेगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्ववर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात शिवतीर्थ राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल्ल चौहाण यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली व शहरात तिरंगा रॅलीला सुरवात करण्यात आली या तिरंगा रॅलीत शहरातील नागरिक सर्व शाळा महाविद्यालय चे विद्यार्थी एनसीसी पथक राष्ट्रीय सेवा योजना पथक स्काऊट अँड गाईड पथक समाविष्ट झाले होते शहरातून भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली संपन्न झाली .
