
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ साहित्य संघ, मधुरम सभागृह येथे “भोई गौरव” तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील केवळ ११ वर्षीय वंशिका पारीसे हिला विशेष राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
वंशिकाने चित्रकला, कविता लेखन, काव्यवाचन या क्षेत्रांबरोबरच राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेला पाचवा क्रमांक ही उल्लेखनीय कामगिरी बजावली असून तिच्या या यशाचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
या कार्यक्रमात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वधू-वर परिचय प्रबोधन मेळावा तसेच ‘भोई गौरव हिरकणी पुरस्कार’ व ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मश्री व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्यांमध्ये दैनिक सकाळ चे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, प्रा. महेंद्र खेडकर, गोपाळ धारपवार, डॉ. श्रीकृष्णा ढाले, बालू कावनपुरे व आयोजक चंद्रकांत लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. महात्मे व संपादक लोणारे यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना स्मृतिचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
हिरकणी पुरस्कार विजेते
रविंद्र पारीसे (युवा उद्योजक व पत्रकार, वर्धा)
दिनेश आमझरे (मुख्य संपादक, पूर्णामाय साप्ताहिक, चांदूर बाजार)
राजू घोडके (मुख्याधिकारी, घाटंजी)
धीरज कापटे (UPSC उत्तीर्ण)
दिलीप मांढरे (तालुका प्रतिनिधी, भद्रावती)
मथुरा सुरजुसे (महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या, अमरावती)
माधुरी आमझरे (आदर्श शिक्षिका, अमरावती)
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजेते
जगदीश ढाले (जळगाव)
प्रमोद तुमाने (यवतमाळ)
गणेश शेंडे (देवळी)
प्रास्ताविक चंद्रकांत लोणारे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय मथुरा सुरजुसे यांनी करून दिला. सूत्रसंचालन राहुल गौर व राजाराम म्हात्रे यांनी केले आणि आभार प्रदर्शन माधुरी आमझरे यांनी मानले.
सभागृहात सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कार्याचा उल्लेख करत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
बॉक्स
“समाज उन्नती व शिक्षण क्षेत्रातील कार्याला चालना देणे हेच या उपक्रमामागचे ध्येय असून, पुरस्कार मिळणे म्हणजे जबाबदारी वाढवणारा सन्मान आहे.”
— पद्मश्री डॉ. विकास महात्मे
“पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजकारण आणि शैक्षणिक कार्याची जबाबदारीही वाढवतो.”
— संपादक चंद्रकांत लोणारे
