
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू असून याला नेमकं जबाबदार कोण आहे हे मात्र नक्की सांगता येत नाही.अशातच या तालुक्यातील रेती घाटावरील रेती उपसा खुप मोठ्या प्रमाणात सुरू असून याबाबत महसूल विभाग कसा काय बिनधास्तपणे वागत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही.अशातच शासनाची नोकरी प्रामाणिकपणे करणाऱ्यांवर मात्र हल्लेखोरांनी हल्ला करावा हा एक विचाराचाच भाग आहे.अशातच दिनांक 17/11/2025 रोज सोमवारला पहाटेच्या वेळी 3 ते 4 वाजताच्या सुमारास कोसारा येथील पोलिस पाटील गाणार आणि महसूल सेवक दिलीप नानाजी पचारे रेती घाटावर गस्त घालण्यासाठी गेले असता त्यांच्यावर ट्रॅक्टर चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते दोघेही यातून बचावले असून दोघांनाही जबर मार लागला असून दोघांनाही कायम अपंगत्व आले आहे.त्यांच्यावर डॉ.कावडे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू असून ताबडतोब या हल्लेखोर ट्रॅक्टर चालक मालकांवर कारवाई करण्यात यावी या करीता महसूल संघटनेच्या वतीने आज दिनांक 18/11/2025 रोज मंगळवारला राळेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर ताबडतोब कारवाई मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
