
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणुक जनतेतून महत्वाच्या पदाच्या निवडणुक , या सर्व निवडणुकीत प्रत्येक पक्षात सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाला निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो आणि एकनिष्ठ आणि प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांनी जेंव्हा केंव्हा निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा दर्शविली तेव्हा मात्र तुम्ही अल्पसंख्याक आहात, तुम्ही पैशांनी कमी पडता अशाप्रकारे काहीतरी कारणं दाखवून निवडणूकीतून थांबवून दिलं जातं अशावेळी ते कार्यकर्ते नाईलाजाने माघार घेत असतो.मात्र त्या कार्यकर्त्यांना निवडणूकीतून थांबवण्याचे कारणं मात्र प्रत्यक्षात ते नसून कुठेतरी जो कार्यकर्ता नेत्यांची हाजी हाजी करतात, नेत्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य दिले जाते.जे उमेदवार कधीकाळी मतदारांनी बघितलेच नाही , ज्यांना मतदारसंघाची माहिती नसते ज्यांची आयुष्य शहरात शिक्षणात नोकरीत घालवली, ज्यांना विकासाचे काही देणं घेणं नसते अशा उमेदवारांना तिकीट देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांना दारोदार फिरायला हे नेते भाग पाडतात. अशाच प्रकारे जर निवडणूका चालत राहिल्या तर पुढाऱ्यांचे वारसदार, हाजी हाजी करणारे, पैशाच्या बढाया हाकणाऱ्याना सतत संधी मिळत राहील तर सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काय करावं असा विचार प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.
