

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी
अत्यावश्यक वस्तूंची झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट वर घाला घालत आहे .एकीकडे लॉकडाउन चा फटका बसल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे .अश्यातच केंद्र सरकारकडून झालेली दरवाढ ,पेट्रोल ,डिझेल कज वाढलेले दर यामुळे सर्व सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे . केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी विधेयक बिल शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य कायदा ,शेतकरी किंमत आश्वासन ,कृषिसेवा करार ,अत्यावश्यक दुरुस्ती कायदा ,गॅस ,पेट्रोल ,डिझेल ची झालेली दरवाढ कमी करावी यासाठी आज मारेगाव तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कमेटी मारेगाव कडून धरणे आंदोलन करण्यात आले.वरील सर्व कायदे रद्द करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर 26/03/2021 ला तहसील मुख्यालयी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या वेळी माजी आमदार वामनरावजी कासावर, नरेंद्र पाटील ठाकरे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव ,तालुकाध्यक्ष मारोती भाऊ गौरकार,अरुणा ताई खंडाळकर,अनिल दरेकर ,शीतल पोटे,शरीफ कुरेशी,शंकर राव मडावी,रमन डोये,दुष्यंत जयस्वाल,शशिकांत आंबटकर,वसंतराव आसुटकर,यादवराव काळे,आकाश बदकी शहरअध्यक्ष युवक काँग्रेस मारेगाव,युसुफ शेख,मारोती सोमलकर,जीवन डाखरे,बळीराम आत्राम,तुळशीराम कुमरे,बबनराव निब्रड तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
