
प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर घरकुलाचा ४ हप्ता रखडला याबाबतचे वृत्त वाढोणा न्यूजने प्रकाशित केले होते. याची दाखल घेऊन दि.०५ एप्रिल रोजी येथील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी म्हाडाचे चीफ इंजिनिअर यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क करून लवकरात लवकर घरकुलाचा रखडलेला चौथा हप्ता नगरपंचायतीला वर्ग करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत ११२५ घरकुलधारकांची रखडलेली शेवटच्या हप्त्याहची रक्कम उपलब्ध झाली असून, काही दिवसात वर्ग करण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचा शेवटचा चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळं सर्व नागरीकातून आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे आभार मानले जात आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, माजी संचालक रफिक सेठ, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जी.प.सदस्य समद खान, शहराध्यक्ष संजय माने, जनार्धन ताडेवाड, शांतीलाल सेठ, भास्कर चिंतावार, कैलास राठोड, प्रवीण कोमावार, नपाचे अधिकारी व कर्मचारी आदींसह पत्रकार नागरिक उपस्थित होते.
