वाईट वेळेत महाराष्ट्राच्या मदतीला आंध्र प्रदेश धावलं, 300 व्हेंटिलेटर्स देण्याचा जगनमोहन रेड्डींची घोषणा

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी

नागपूर: महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडं आर्जव करत आहे. महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली